माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर भाजपने आपला मोहरे आता परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे वळवला आहे. मनसुख हिरेन खून प्रकरणातील आरोपी निलंबित एपीआय सचिन वाझे याच्याकडे परब यांनी शंभर कोटींचे टार्गेट दिल्याची माहिती न्यायालयात खुद्द वाजनेच दिली आहे. त्यामुळे परब यांच्यावरही देशमुख यांच्याप्रमाणे कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. क्रिकेटपटू हरभजनसिंग याच्या मदतीतून कोथरूडमध्ये कोरोनासाठी मोबाईल टेस्टिंग व्हॅन सुरू करण्याच्या योजनेचीही माहिती त्यांनी या निमित्ताने दिली.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics